केज न.प.चे गटनेते हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड यांच्या पाठपुराव्याला यश.
“चाळीस वर्षा पासून चा छोट्या व्यावसाय धारकांच्या व्यावसायाचा प्रश्न मार्गी
” जिरायत खात्याची जागा अखेर केज नगरपंचायतीच्या ताब्यात आल्यामुळे व्यावसाय धारकात नवचैतन्य निर्माण झाले असून आनंदोत्सव व्यक्त केला जात आहे.
केज/प्रतिनिधी
केज शहरातील मागील चार ते साडेचार वर्षा पासून सार्वजनिक विकासकामांना गती मिळत असतांना एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटना प्रत्यक्षात अनेक दिवसांच्या प्रयत्ना नंतर गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला केज येथील छोट्या व्यावसाय धारकांच्या व्यावसायाच्या जागेचा प्रश्न मिटला आहे अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये गटनेते हारुणभाई इनामदार यांनी दिली आहे. जिरायत खात्याची शासकीय जागा अधिकृतपणे केज नगरपंचायत प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आली आहे. जागेचे ताबा पत्र महसूल प्रशासनाने अधिकृतपणे केज नगरपंचायत ला हस्तांतरित केले आहे. नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने मंगळवार, दिनांक ४ जून २०२६ रोजी ही हस्तांतरण प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पूर्ण करण्यात आली.असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा गटनेते हारुणभाई इनामदार व केज नगर पंचायत च्या नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड यांच्या
पाठपुराव्यामुळे आणि सर्व राजकीय वरीष्ठांच्या सहकार्याने
केज नगरपंचायतीला यश प्राप्त झाले आहे अशी प्रतिक्रिया नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड व गटनेते हारूणभाई इनामदार यांनी सदर जागेचा ताबा घेते वेळी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. यासाठी गटनेते हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सिताताई बनसोड यांनी सर्व वरिष्ठांना आणि नगरसेवकांना विश्वासात घेऊन सातत्याने शासन व प्रशासन स्तरावर पाठपुरावा केला, त्यांच्या पाठपुराव्याला यश आल्यामुळे सर्व केजवासीयांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
