सुशील रावसाहेब गदळे यांचीपोलिस उपनिरीक्षक पदी निवड
दहिफळ (वडमाऊली) च्या प्रतिष्ठित नागरिकातर्फे सत्कार
केज /प्रतिनिधी
केज तालुक्यातील दहिफळ (वडमाऊली ) चे सुपुत्र सुशील रावसाहेब गदळे यांची नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केल्याने त्यांची पी एस आय पदी निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतूनपोलीस उपनिरीक्षक पदावर पोहोचल्याने दहिफळ वडमाऊली व परिसरातून कौतुक होत आहे . पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झल्याबद्दल या कुटुंबाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
