७ व ८ जुलै रोजी बीड जिल्ह्यातील अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शाळा बंद; हजारो शिक्षक मुंबई आंदोलनात सहभागी होणार!

७ व ८ जुलै रोजी बीड जिल्ह्यातील अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शाळा बंद; हजारो शिक्षक मुंबई आंदोलनात सहभागी होणार!

७ व ८ जुलै रोजी बीड जिल्ह्यातील अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शाळा बंद; हजारो शिक्षक मुंबई आंदोलनात सहभागी होणार!

बीड /प्रतिनिधी
राज्यातील शिक्षक समन्वय संघाच्या राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा देत ७ व ८ जुलै रोजी बीड जिल्ह्यातील सर्व अंशतः अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. याबाबत बीड जिल्हा शिक्षक समन्वय संघाच्या वतीने शिक्षणाधिकारी श्रीमती प्रियाराणी पाटील यांना निवेदन देण्यात आले. तसेच यावेळी जिल्ह्यातील हजारो शिक्षक मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू असलेल्या धरणे आंदोलनात सहभागी होणार असल्याचे ही कळविण्यात आले.
राज्यातील अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २२ जूनपासून आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. मात्र, शासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने शिक्षक समन्वय संघाने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ७ व ८ जुलै रोजी राज्यभरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या बंद मध्ये राज्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, संस्थाचालक, मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी सहभागी होऊन शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांना बळ द्यावे, असे आवाहन खंडेराव जगदाळे यांनी केले. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून बीड जिल्ह्यातील सर्व अंशतः अनुदानित विनाअनुदानित शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी दोन दिवस ७ व ८ जुलै रोजी शाळा बंद ठेवून आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यानुसार जिल्हा समन्वय संघाच्या वतीने शिक्षणाधिकारी श्रीमती प्रिया राणी पाटील मॅडम यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे. या निवेदनावर श्री. जितेंद्र डोंगरे, श्री. तुकाराम शिंदे, श्री. प्रताप पवार, श्रीमती मुक्ता मोटे मॅडम, श्री. आत्माराम वाव्हळ, श्री. अरविंद सौंदलकर, श्रीमती माने मॅडम, श्रीमती कांडेकर मॅडम, श्री. शेख, श्री. अशोक मोरे, श्री. महादेव शेंडगे, श्री. सुतार, श्री.भागवत यादव आदी पदाधिकारी व शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या असून, जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिक्षक मुंबईतील आंदोलनात सहभागी होणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *