मा. जिजाऊचे वंशज शिंदखेड राजा येथील श्री. शिवाजी राजे जाधव यांचा केज मध्ये सत्कार संपन्न
केज/ प्रतिनिधी :
केज येथील शासकीय विश्राम ग्रहात सदिच्छा धावती भेट दिली असताना छावा संघटनेचे जिल्हा प्रमुख मा. शिवाजी दादा ठोंबरे व केज विकास संघर्ष समितीचे प्रमुख प्रा. हनुमंत भोसले सर, बहुजन क्रांती मोर्चाचे बाबुराव गालफाडे सर, तसेच रोटरी क्लब केजचे महेश जाजू, मराठा आरक्षण उपोषण कर्ते दिगबर नाना तपसे, माजी सैनिक संघटनेचे सपाटे सर, व पत्रकार पांडुरंग कसबे, ईत्यादी जन उपस्थित होतें. या वेळी मा.राजे शिवाजीराव जाधव जिजाऊ यांचे वंशज असे म्हणाले की, 15 जुन ते 17 जुन 2026 ला मा. जिजाऊ यांच्या स्मुर्ती दिना निमित्य आयोजित सिंदखेडराजा ते पाचड रायगड रॅली मध्ये बीड व केज येथील बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा असे आव्हान केले…
