हरवलेले मोबाईल शोधून परत देण्यात नेकनूर पोलिसांना यश
नेकनूर/प्रतिनिधी
नागरिकांची मालमत्ता सुरक्षित राखणे आणि हरविलेल्या वस्तू त्यांच्या मालकांपर्यंत पुन्हा पोहोचविणे हेही पोलिसांचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. त्याच भावनेतून कार्य करत नेकनूर पोलीस स्टेशनने सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून हरविलेले तीन मोबाईल फोन शोधून संबंधित तक्रारदारांच्या ताब्यात दिले.
मोबाईल हरवल्यानंतर तो पुन्हा मिळेल, अशी अनेकांची आशा संपते. मात्र, योग्य वेळी पोलीसांकडे तक्रार नोंदवून CEIR पोर्टलवर माहिती नोंदवल्यास हरविलेला मोबाईल शोधून मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते, याचा प्रत्यय या कारवाईतून पुन्हा एकदा आला आहे.
आज पोलीस ठाणे नेकनूर येथे खालील नागरिकांना त्यांचे हरविलेले मोबाईल परत करण्यात आले.
1.भारत परमेश्वर शिंदे, रा. चौसाळा
Realme 13 Pro मोबाईल.
2.भगवान ज्ञानोबा कुठे, रा.
चौसाळा (हिंगणी खुर्द)
OPPO कंपनीचा मोबाईल.
3.महादेव रसाळ, राधिका हॉटेल,
मांजरसुंबा
OPPO कंपनीचा मोबाईल.
ही यशस्वी कारवाई केज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. व्यंकटराम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार विशाल अर्जुन क्षीरसागर/1885 व पोलीस अंमलदार बाळा ढाकणे/ 444 यांनी पार पाडली.
मोबाईल परत मिळाल्यानंतर तक्रारदारांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले. त्यांनी नेकनूर पोलिसांच्या तत्परतेचे व प्रामाणिक प्रयत्नांचे कौतुक करत पोलीस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले.
*नागरिकांना आवाहन*
नेकनूर पोलीस स्टेशनतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास विलंब न करता त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा. वेळेत तक्रार दिल्यास CEIR पोर्टलच्या माध्यमातून मोबाईल शोधण्याची आणि त्याचा गैरवापर रोखण्याची शक्यता अधिक वाढते.नेकनूर पोलीस नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असून, प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन नागरिकांना न्याय व मदत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहेत. कायद्याचे राज्य, नागरिकांची सुरक्षितता आणि लोकविश्वास हेच नेकनूर पोलिसांचे सर्वोच्च ध्येय आहे.
