दहिफळ येथील वडमाऊली देवीची यात्रेचे उद्या पासुन सुरवात
केज । प्रतिनिधी
केज तालुक्यातील दहीफळ वडमाऊली येथे तिर्थक्षेत्र असलेल्या वडजुआई( वडमाऊली )देवीचा यात्रा महोत्सव दरवर्षी प्रमाणे यावर्षीही उद्या शुक्रवार दि.२५ एप्रिल ते २९ एप्रिल दरम्यान होत असलेल्या यात्रेनिमित्त दोन दिवस लोकनाट्य (तमाशा) व आराधी गिते या सांस्कृतीक कार्यक्रमाला पंचक्रोशितील भावीक भक्तानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवावी असे आव्हान यात्रा कमेटीचे अध्यक्ष येडूनाना ठोंबरे,सचिव भिकचंद ठोंबरे(सावकार), सदस्य हारीमास्तर ठोंबरे सह सर्व सदस्यांनी केले आहे.
केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथे तिर्थक्षेत्र वडजुआई ( वडमाऊली ) देवीचे मंदीर आहे दरवर्षी चैत्र महीन्यातील अष्टमी पासुन या यात्रेला सुरुवात होतेे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दि.२५ एप्रिल शक्रवार रोजी सकाळी देवीची पालखी दहिफळ येथून बॅंड लेझीम पथक व आराधी मंडळी देवीची गाणे गाऊन पालखी महोत्सवात सहभागी होतात. या वडजुआई (वडमाऊली) देवीला महीला पुरणपोळीचा नैवद दाखवुन जेवणाचा कार्यक्रम करतात यात्रेनिमित्त दहिफळ वडमाऊली येथील युवा नेते तथा पंचायत समीती सदस्य दत्तात्रय (पिंटु) ठोंबरे,सरपंचडाॅ.शशिकांत दहिफळकर, राहूल गदळे,शरद गदळे यांनी व यात्रा कमिटीचे कमेटीचे अध्यक्ष येडूनाना ठोंबरे,सचिव भिकचंद ठोंबरे (सावकार),सदस्य हारीमास्तर ठोंबरे सह सर्व सदस्यांनी व गावक-यांनी पुढाकार घेऊन ग्रामीण भागातील जनतेच्या मनोरंजनासाठी २५ एप्रिल व २६ एप्रिल हे दोन दिवस संध्याकाळी आठ वाजता चांगदेव गव्हाणे यांचा बहुरंगी लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.रविवारी संध्याकाळी आराधी गीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सोमवारी संध्याकाळी वडमाऊली देवी मंदीर परीसरात देवीचा छबीना मिरवणूक होईल तर मंगळवारी संध्याकाळी दहिफळ गावात छबिना मिरवणूकीने यात्रेचीसांगता होणार आहे.या आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमात यात्रेकरुंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवावी असे आव्हान वडमाऊली यात्रा कमेटीचे अध्यक्ष येडूनाना ठोंबरे,सचिव भिकचंद ठोंबरे (सावकार), कोषाध्यक्ष हारीमास्तर ठोंबरे,सदस्य गंगाधर गदळे,रामहारी ठोंबरे,बन्सी ठोंबरे सह इतर सदस्यांनी व गावक-यांनी केले आहे.