कु.सय्यद अरूष शौकत अली हिचे दहावी परीक्षेत उज्ज्वल यश

कु.सय्यद अरूष शौकत अली हिचे दहावी परीक्षेत उज्ज्वल यश

कु.सय्यद अरूष शौकत अली हिचे दहावी परीक्षेत उज्ज्वल यश

सर सय्यद उर्दू विद्यालयाची यशस्वी परंपरा

बीड /प्रतिनिधी
येथील सर सय्यद अहेमद खान उर्दु माध्यमिक विद्यालयाची हुशार विद्यार्थिनी सय्यद अरूष शौकत अली हिने महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेत ९१ टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अरूष हिने सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि पालक तसेच शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. अभ्यासाबरोबरच शिस्तबद्ध दिनचर्या आणि आत्मविश्वास यामुळे तिला उत्कृष्ट गुण मिळविणे शक्य झाले.
तिच्या या यशाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार, शिक्षक आणि समाजातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यातही अरूष हिने असेच यश संपादन करून शाळा व शहराचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा सर्व स्तरातून व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *