मिनी मंत्रालयाच्या’ निवडणुकीची रणधुमाळी सुरू आरक्षण सोडतीनंतर शेख अक्रमपाशा (शाळम सर) नेकनूर जिल्हापरिषद गटातून निवडणूक लढणार

मिनी मंत्रालयाच्या’ निवडणुकीची रणधुमाळी सुरू  आरक्षण सोडतीनंतर शेख अक्रमपाशा (शाळम सर) नेकनूर जिल्हापरिषद गटातून निवडणूक लढणार

मिनी मंत्रालयाच्या’ निवडणुकीची रणधुमाळी सुरू

आरक्षण सोडतीनंतर शेख अक्रमपाशा (शाळम सर) नेकनूर जिल्हापरिषद गटातून निवडणूक लढणार

नेकनूर /प्रतिनिधी

मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट, गण, अध्यक्ष आणि सभापती पदांच्या आरक्षणाची सोडत जाहीर होताच निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. इच्छुकांनी आपापल्या मतदारसंघांत ‘चाचपणी’ सुरू केली असून, समाज माध्यमांवर आपली उमेदवारी निश्चित झाल्याचे मजकूरही प्रसिद्ध होत आहेत.
आरक्षण सोडतीनंतर शेख अक्रमपाशा (शाळम सर) नेकनूर जिल्हापरिषद गट निवडणूक लढणार असल्याने चांगल्या चांगल्या नेत्यांची धडकी भरली आहे.
साडेतीन वर्षांपासून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका रखडल्या असून, प्रशासकराज आहे. त्यामुळे त्या-त्या मतदारसंघातील अगोदर असलेल्या पदाधिकाऱ्यांचे राजकीय वजन कमी झाले. तेथील राजकीय समीकरणेही बदलून गेल्यामुळे प्रस्थापितांचा पुन्हा नव्याने तेथे जम बसविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे प्रस्थापितांना या निवडणुकीत धक्का बसणार? अशा चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान,आरक्षण सोडतीनंतर शेख अक्रमपाशा (शाळम सर) नेकनूर जिल्हापरिषद गट निवडणूक लढणार असल्याने निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यादृष्टीने त्यांच्या जिल्हा पातळीवरील नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. दिवाळीनंतर निवडणूक होणार असल्याने कार्यकर्त्यांची व युवा पिढीही निवडणुकीच्या कामाला लागली आहे .दिवाळी गोड करून जिल्हापरिषद निवडणूक जिंकून पुन्हा एकदा दिवाळी साजरी करू असा विश्वास आता जनतेनेच ठरवल्याची चर्चा ऎकायला मिळत आहे.त्यामुळे आता प्रस्थापितांना धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *